ओळखलंत का या छोट्या सैनिकाला, टेलिव्हिजनवरचा आहे लाडका अभिनेता?

By  
on  

या चिमुकल्या सैनिकाला तुम्ही ओळखलंत का. सध्या टेलिव्हिजनवरचा हा लोकप्रिय अभिनेता आहे. अभिनयाचं बाळकडून त्याला आई आणि आजोबांकडून मिळालं आहे. ज्येष्ठ दिवंगत अभिनेते जयराम कुलकर्णी यांचा नातू आणि प्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक म्हणजेच अभिनेता विराजस कुलकर्णीच्या बालपणीचा हा फोटो आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे विराजस महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलाय. या मालिकेत विराजस साकारत असलेला आदित्य सर्वांनाच भावतो. सई आणि आदित्यची ही ट्विस्टवाली लव्हस्टोरी सध्या हिट आहे. 

 
 

विराजस अभिनेताच नाही तर एक उत्तम लेखकही आहे. ती एन्ड ती या मराठी सिनेमाचं लेखन त्याने केलं आहे. तर आई मृणाल कुलकर्णीसोबत या सिनेमाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची धुरासुध्दा सांभाळली होती. तसंच विराजस लिखित इडियट बॉक्स ही वेबसिरीजसुध्दा अलिकडेच चाहत्यांच्या भेटीला आली होती. याशिवाय विराजसला जादूचे प्रयोग करण्याची प्रचंड आवड आहे. 

हा बालपणीचा गोड फोटो पोस्ट करत विराजस लिहतो,"मी लहान असताना मला 'Border' हा चित्रपट खूप आवडायचा - म्हणून मी सारखे हे कपडे घालून आपण सैन्यात असल्याचा अभिनय करायचो. घरच्यांच्या लवकरच लक्ष्यात आलं की माझा कल हा त्या वाक्यातल्या' सैन्यापेक्षा ' ' अभिनयाकडे ' होता!"

Recommended

Loading...
Share