ह्या मराठी अभिनेत्रीचा मकरसंक्राती स्पेशल साज तुम्ही पाहिलात का?

By  
on  

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आपले नानाविविध लुक्स ती चाहत्यांशी या माध्यमातून शेअर करते. मराठी सिनेसृष्टीतली सुंदर व गुणी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेवर चाहते नेहमीच फिदा असतात. ट्रेडिशनल आणि वेस्टर्न अशा दोन्ही पेहरावात ती सुंदर दिसते.

मकरसंक्रातीचा सणाचा सर्वत्र आहे. 'तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला', असं म्हणत सुवासिनींच्या हळदीकुंकवाचा कार्यक्रम रंगणार आहे. सध्या या कार्यक्रमासाठी खास साड्या नेसण्याकडे स्त्रियांचा कल असतो. म्हणून संक्रातीला काळ्या रंगाची साडी नेसण्याला प्राधान्य दिलं जातं. यातच वैविध्य म्हणून खणाच्या साड्यांची रेलचेल सध्या ट्रेंडमध्ये आहे. प्रार्थना बेहरेचं  हे लेटेस्ट फोटोशूट तुम्हाला यंदा संक्रातीचा साज कसा करायचा या प्रश्नाचं उत्तर देतोय. 

 

 

 

या  काळ्या रंगाच्या खणाच्या साडीत प्रार्थनाचं सौंदर्य खुलून दिसत आहे.   

 

 

 

प्रार्थनाच्या या दिलखेचक अदांवर चाहते फिदा झाले आहेत. 

 

 

 'छूमंतर' या हिंदी आणि मराठी द्विभाषिक सिनेमाच्या चित्रीकरणासाठी अलिकडेच प्रार्थना लंडनमध्ये होती. या सिनेमात प्रार्थनासोबतच अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळे झळकणार आहेत.

 

Recommended

Loading...
Share