या कलाकारांनी खास फोटो शेअर करत दिल्या ‘Army Day’ च्या शुभेच्छा

By  
on  

आज आर्मी डे. देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देत असलेल्या सैनिकांसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. देशातील नागरिकांना रात्री सुखाने झोप घेता यावी यासाठी सीमेवर अखंड जागे असतात. प्रसंगी प्राणाची बाजीही लावतात. याच सैनिकांचा गौरव कलाकारांनी पोस्टमधून केला आहे. नितीश चव्हाण आणि सुमीत पुसावळे यांनी पोस्ट शेअर करत जवानांना मानवंदना दिली आहे.

 

 

नितीश आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘ अब जो भी शोला बनके पत्थर हे पिघलाना अब जो भी बादल बनके पर्बत पर हे छाना सर्व जवानांना भारतीय सेना दिवसाच्या शुभेच्छा... नितीशने त्याच्या पहिल्या वहिल्या मालिकेत सैनिकाची भूमिका साकारली होती. ‘लागीरं झालं जी’ मालिकेतील त्याची ही भूमिका गाजली होती. 

 

 

तर बाळूमामाची व्यक्तिरेखा साकारणा-या सुमीत पुसावळेनेही या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘जिनमे अकेले चलने के हौसले होते हैं, एक दिन उन्ही के पीछे काफिले होते हैं सेना है तो हम हैं! भारतीय सेना दिवस की शुभकामनाएं.. सुमीतने त्याचा सैनिकाच्या वेषातील फोटो शेअर केला आहे

Recommended

Loading...
Share