नाट्यनिर्मितीसाठी लवकरच मिळणार निर्मात्यांना अनुदान, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची माहिती

By  
on  

करोना संकट आणि लॉकडाऊनमुळे नाट्यवर्तुळाला उतरती कळा लागली होती. परंतु हळूहळू आता नाटयवर्तुळ भरारी घेऊ लागलं आहे. अनेक नाटकांचे पुन्हा जोमाने शुभारंभ झाले आहेत. हळूहळू प्रेक्षक नाट्यगृहाकडे वळतायत.या नाट्यनिर्मितीला प्रोत्साहन आणि मदत म्हणून नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा होईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. यासाठी चाळीस लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फत नाट्य अनुदान योजना राबवली जाते. या योजने अंतर्गत नवीन नाटके, संगीत नाटके, प्रयोगात्मक नाटके याना निर्मितीसाठी अनुदान दिले जाते. मात्र काही नवीन नाटकांना हे अनुदान अद्याप मिळाले नव्हते.

यासंदर्भात संबंधितांना सूचना दिलेल्या असून लवकरच हे नाट्य अनुदान वितरित होईल,असे  सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांनी सांगितले आहे. 

Recommended

Loading...
Share