गायिका कार्तिकी गायकवाडची पहिली मकरसंक्रांत, पाहा Photos

By  
on  

गायिका कार्तिकी गायकवाड यंदाच रोनित पिसे या तरुणाशी लग्नबंधनात अडकली. तिच्या शाही लग्नसोहळ्याची प्रचंड चर्चा सिनेविश्वात रंगली होती. सोशल मिडीयावरुन या शानदार लग्नसोहळ्याचे फोटो चाहत्यांना पाहायला मिळाले. यंदाची मकरसंक्रात कार्तिकीची लग्नानंतरची पहिलीच मकरसंक्रांत. या मकरसंक्रात सणानिमित्त कार्तिकीने तिचे खास फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

 

 

 

नवविवाहितेसाठी तर हल्ली हलव्याचे खास दागिने बनवून घेतले जातात. लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला नवविवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे.

 

 

 

 

‘सारेगमप लिटिल चॅम्प’चे विजेतेपद पटकावणारी गायिका कार्तिकी गायकवाडने काही दिवसांपूर्वीच रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर कार्तिकीने पहिली मकर संक्रांत साजरी केली आहे.

 

 

कार्तिकीने यावेळी हिरवी साडी आणि त्यावर हलव्याचे दागिने परिधान केले.

कार्तिकीने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Recommended

Loading...
Share