बॉयफ्रेंड आदित्यसाठी अभिनेत्री रसिका सुनीलची खास पोस्ट

By  
on  

शनाया म्हणून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनिल हिने काही दिवसांपूवीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला होता. लॉस एंजलिस येथील आदित्य बिलागी या तरुणाला रसिका डेट करतेय. दोघांचे रोमॅण्टिकपेक्षा धम्माल-मस्तीतले फोटो शेअर करत ही न्यूज रसिकाने चाहत्यांना सांगितली होती. 
 

आता नुकतंच रसिकाने इन्स्टा स्टोरीवर आदित्यसाठी स्पेशल पोस्ट लिहिली असून त्याचं प्रचंड कौतुक केलं आहे. रसिका गेल्या काही दिवसांपासून आजारी असून या आजारपणात आदित्य तिची योग्य ती काळजी घेत असल्याचं तिने म्हटलंय. 

 


 

 

‘मी गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे आणि आदित्य माझी खूप चांगल्याप्रकारे काळजी घेतोय. जेवण असो किंवा औषधं सर्वकाही तो मला जागीच आणून देतोय आणि संपूर्ण घराची काळजी घेतोय. खरंतर त्याच्यामुळे मला अजिबात घराची आठवण येत नाही. कारण मी घरी असल्यासारखंच तो सर्व गोष्टींची काळजी घेतोय. मी आता बरी आहे’, असं लिहित तिने आदित्यचे आभार मानले. रसिकाने या पोस्टद्वारे आदित्यविषयीचं प्रेमसुद्धा व्यक्त केलं.
 

 

Recommended

Loading...
Share