अभिनेता-दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीला कन्यारत्नाचा लाभ

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेता-दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीच्या घरी गोंडस चिमुकलीचं आगमन झालं आहे. आपण बाबा झाल्याची गुड न्यूज निपुणनेच त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन दिली आहे. निपुणने पत्नी आणि लेकीसोबतचा क्युट फोटो शेअर करत एक खास मेसेजही लिहला आहे. 

निपुण आणि संचिता चांदोरकर यांच्या लग्नाला पाच वर्ष झाल्यानंतर त्यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. निपुणने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यात एका फोटोमध्ये त्याची चिमुकली आईची कुशीत झोपली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये निपुणच्या खांद्यावर त्याची इवलीशी चिमुकली झोपलं आहे. सिनेवर्तुळातील सेलिब्रिटींसह चाहत्यांनी निपुणच्या या फोटोंवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

भाडिपा म्हणजेच भारतीय डिजिटल पार्टीमुळे या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे तरुण वर्गाला निपुण धर्माधिकारी हे नाव नवीन नाही. अनेक सिनेमे आणि वेबसिरीजचम दिग्दर्शन निपुणने केलं आहे. त्यापैकीच वन्स अ अयर या वेबसिरीजमध्ये निपुणने प्रमुख भूमिकाही साकारली होती. तसंच लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित अनेक महोत्सव गाजवणा-या धप्पा या मराठी सिनेमांचं दिग्दर्शनही त्यानेच केलंय. 

Recommended

Loading...
Share