'ती आणि ती' आता 'फ्रेश लाईम सोडा' घेऊन येतायत, जाणून घ्या

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील दोन गुणी अभिनेत्री पुन्हा एकदा एका नव्या-को-या प्रोजेक्ट्सच्या निमित्ताने स्क्रीन शेअर करणार आहेत. टायटलवरुन ती आणि ती कोण  हे तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल. या ती आणि ती म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे. या सौंदर्यवतींना पुन्हा एकत्र सिनेमात पाहता येणार आहे. फ्रेश लाईम सोडा असं या सिनेमाचं हटके नाव आहे. 

अभिनेत्री प्रार्थना बेहरेनेच तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन या आगामी प्रोजेक्टचं फर्स्ट पोस्टर शेअर करत ही बातमी चाहत्यांना दिली. विशेष म्हणजे प्रार्थनाचे पती अभिषेक जावकरच या सिनेमाचं  लेखन आणि दिग्दर्शन करतायत. तसंच त्यांचीच निर्मिती संस्था रेड बल्ब स्टुडिओज या मराठी सिनेमाची निर्मिती करतेय. हा सिनेमा सिनेमागृहातच प्रदर्शित होईल असं प्रार्थनाने आपल्आ पोस्टमध्ये नमूद केलं आहे. प्रवास स्वप्नांचा अशी टॅगलाईन असलेला हा सिनेमा बहुधा प्रवासात घडणा-या गोष्टीवर बेतलेला आहे, असा अंदाज व्यक्त होतोय. 

प्रार्थना आणि सोनाली या अभिनेत्रींच्या जोडीची कमाल मितवा, ती एन्ड ती यानंतर पुन्हा एकदा फ्रेश लाईम सोडामधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. एकूणच या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे. 
 

Recommended

Loading...
Share