कुणीतरी येणार येणार गं, वहिनीसाहेबांचं बेबी बंपसह फोटोशूट

By  
on  

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील नंदिता वहिनी म्हणून अभिनेत्री धनश्री काडगावकर महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. धनश्री सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. धनश्री आता लवकरच आई होणार आहे, पण तत्पूर्वी ही मॉम टू बी अभिनेत्री सोशल मिडीयावर तिच्या या खास दिवसांतल्या विविध पोस्ट चाहत्यांशी शेअर करते. 

आतासुध्दा धनश्रीने  बेबी बंप फ्लॉंण्ट करत एक क्युट फोटोशूट नुकतंच पोस्ट केलं आहे. 

 कोड कौतुक करुन घेण्यास धनश्री जराही कमी करताना दिसत नाही. धनश्री सोशल मिडीयावर ह्या काळातसुध्दा प्रचंड सक्रीय असते. नानाविविध पोस्ट आणि व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.

 

अलिकडेच धनश्रीचं डोहाळे जेवण सोहळा थाटात पार पडला होतं. ते फोटोसुध्दा धनश्रीने शेअर केले होते. धनश्रीला आता बाळाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. 

 

 

Recommended

Loading...
Share