नवराई मानसी नाईकच्या लूकसोबत तिच्या आईने घेतलेला उखाणाही होतो आहे व्हायरल

By  
on  

अभिनेत्री नृत्यांगना मानसी नाईकचं लग्न अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलं आहे.उद्या म्हणजेच 19 जानेवारी रोजी अभिनेत्री मानसी नाईक प्रदीप खरेरासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मानसीचा ग्रहमकाचा विधी नुकताच पार पाडला. यावेळी मानसीने तिचे काही फोटोही शेअर केले आहेत. 

 

 

यासोबतच मानसीने एका व्हिडियोही शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये तिची आई उखाणा घेताना दिसते आहे. या उखाण्याचा व्हिडियो तुफान व्हायरल होताना दिसतो आहे. व्हिडीओमध्ये मानसीची आई उखाणा घेत म्हणते, ‘माझी लेक आहे पडद्यावर चमचमणारी चांदणी, लग्नघटीका समीप आली, गाऊ आनंदाची गाणी, ग्रहमकाचे दिवस सांगते राजन माझे राजा आणि मी त्यांचीच राणी.’ मानसीने हा क्युट व्हिडियो आकाशाचा केला कागद, समुदाची केली शाई, तरीही आईचा महिमा, लिहीता येणार नाही.. आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे’ हे कॅप्शन देत शेअर केला आहे.

Recommended

Loading...
Share