सिद्धार्थ-मितालीच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात, पाहा फोटो

By  
on  

मराठी सिनेसृष्टीत सध्य लग्नाचा मौसम सुरु आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अभिज्ञा भावे, मानसी नाईक यांच्यानंतर आणखी एक सेलिब्रिटी कपल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सिद्धार्थ- मिताली ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी सज्ज आहे. मितालीने नुकतेच मुहुर्तमेढचे फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत.

 

 

या जोडीने 2019 मध्ये साखरपुडा केला होता. मितालीच्या या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मिताली सध्या ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कस्तुरीच्या भूमिकेत दिसते आहे. तर सिद्धार्थ ‘सांग तू आहेस का’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Recommended

Loading...
Share