'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेता समीर परांजपेला कन्यारत्नाचा लाभ

By  
on  

सध्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. लती आणि अभ्याची हेटवाली लव्हस्टोरी रसिकांच्या चांगलीच पसंतीस उतरलीय. लतिका आणि अभिमन्यू यांची जोडी प्रेक्षकांची लाडकी आहे. यातील अभिमन्यूची भूमिका साकारणा-या डॅशिंग अभिनेता  समीर परांजपेच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज  आहे. समीर नुकताच बाबा झाला आहे. त्याला गोड कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. समीरनेच त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन पत्नीसोबतचा एक क्यूट फोटो शेअर करत चाहत्यांना ही खुशखबर दिली. 

समीर परांजपे आणि त्याची पत्नी अनुजा परांजपे यांच्यासह त्यांच्या घरी आगमन झालेल्या चिमुकलीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

गोठ, गर्जा महाराष्ट्र माझा, अग्निहोत्र २, माझे पती सौभाग्यवती या समीर परांजपे अभिनीत गाजलेल्या मालिका.  समीरने मालिकांसोबतच नेटफ्लीक्स वरील ‘क्लास ऑफ ८३’ मध्येही काम केले आहे. त्यात त्याने अस्लम खान ही लक्षवेधी व्यक्तिरेखा साकारली आहे.

Recommended

Loading...
Share