
आधी बानूबया म्हणून आणि नंतर शनाया म्हणून चुलबुली गर्ल ईशा केसकर महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून ईशा नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. विविध पोस्ट आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती चर्चेत असते. सध्या तिच्या आणि बॉयफ्रेंड ऋषी सक्सेना यांच्या लग्नाच्या बातम्यांनासुध्दा उधाण आलं आहे. अनेक मराठी कलाकार यंदा लग्नबंधनात अडकले. पण नुकतंच ईशाच्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गोव्याच्या समुद्रकिनारी बिकीनीतला फोटोे ईशाने चाहत्यांशी शेअर केला आहे. क्षणार्धातच या फोटोंवर लाईक्सचा अक्षरश: वर्षाव होतोय.
इशाच्या या बिकीनीतील फोटोला आत्तापर्यंत 31 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.