अभिनेता सिद्धार्थ चांदेकर का म्हणतोय ‘आता जातो काशीला’ जाणून घ्या

By  
on  

क्युट कपल मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाची त्याचे चाहते आवर्जुन वाट पहात आहेत. या जोडीच्या लग्नाची तारीख अजून समोर आली नाही. पण लग्नाच्या विधींना मात्र सुरुवात झालेली दिसत आहे. मितालीने अलीकडेच मुहुर्तमेढचे फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

 

 

त्यानंतर आज सिद्धार्थच्या ग्रहमकाचे फोटो समोर आले आहेत. सिद्धार्थने याचे खास फोटो पोस्ट करत कॅप्शन दिलं आहे. आपल्या पोस्टमध्ये सिद्धार्थ म्हणतो, ‘सोड मुंज झाली. आता जातो काशी ला. ओके बाय.’ यामध्ये मुंडावळ्या बांधलेला नाम ओढलेला सिद्धार्थ खुपच खास दिसतो आहे. या जोडीने 2019 मध्ये साखरपुडा केला होता.

 

Recommended

Loading...
Share