मधुर भांडारकर दिग्दर्शित 'इंडीया लॉकडाऊन' या बॉलिवूड सिनेमात झळकतेय आपली सई

By  
on  

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस लुक्स तसंच आपल्या दमदार अभिनयाने ती रसिकांची मनं जिंकते. मराठीसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या अभिनयाचा झेंडा अटकेपार रोवणा-या मराठी अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकर हे नाव आता आग्रहानं घ्यावं लागेल. त्याला कारणही तसंच आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि क्रिती सेनॉन स्टारर मिमी या बॉलिवूडपटानंतर  बॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या आगामी 'इंडिया लॉकडाऊन' या सिनेमात सई ताम्हणकर झळकतेय. सईची ह्या सिनेमातली भूमिका खुप महत्त्वपूर्ण असल्याचं बोललं जात आहे. 

'इंडिया लॉकडाऊन' या सिनेमाचं फर्स्ट लुक पोस्टर नुकतंच सईने तिच्या इन्स्टाग्रामवरुन उलगडलं. मधुर भांडरकर दिग्दर्शित या सिनेमात सईसोबतच प्रतिक बब्बर, आहाना कुम्रा आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. सईच्या चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.

या सिनेमाचं हे टीझर पोस्टर उलगडत सई म्हणते, "आता जास्त काही सविस्तर तुम्हाला मी सांगू शकत नाही. फक्त तुमचं प्रेम मला  द्या."

 

 

 

यापूर्वी सई ताम्हणकर 'हंटर', 'लव्ह सोनिया' या बॉलिवूडपटातही झळकली होती.  मधुर भांडारकर दिग्दर्शित  सिनेमात आपली सई झळकतेय हे समजताच सिनेसृष्टीसह तमाम चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Recommended

Loading...
Share