हॅप्पी मेहंदी म्हणत सिध्दार्थ चांदेकरने शेअर केला हा स्पेशल फोटो

By  
on  

मराठी सिनेविश्वातली प्रसिध्द जोडी सिध्दार्थ आणि मिताली हे दोघं लग्नबंधनात अडकतायत. त्यांच्या लग्नसोहळ्यापूर्वीच्या कार्यक्रमांना दमदार सुरुवात झालीय. हळद, मेहंदी, संगीत असा भरगच्च कार्यक्रम पार पडतोय. नुकताच त्यांच्या मेहंदी सोहळ्यातले फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळाले, पण यात  सिध्दार्थने पोस्ट केलेला एक खास फोटो लक्ष वेधून घेतोय. 

सिध्दार्थने आई सीमा चांदेकर यांच्यासोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे. यात सिध्दार्थच्या आई अभिनेत्री सीमा चांदेकर यांनी लाडक्या लेकाच्या   लग्नात मोठ्या  हौसेने हाताला मेहंदी लावलेली पाहायला मिळतेय. सिध्दार्थने आईसोबतच्या या खास क्षणांना कॅप्शन म्हणून हॅप्पी मेहंदी असं लिहलं आहे. 

 

 

महत्त्वाचं म्हणजे सिध्दार्थ त्याच्या आईची प्रचंड काळजी घेतो. तिला जीवापाड जपतो. तुम्हाला एक गोष्टसुध्दा लक्षात आली असेल. ती म्हणजे त्याच्या नावात तो आईचं नाव लावतो. सिध्दार्थ सीमा चांदेकर असंच त्याच्या सिनेमा आणि मालिकांच्या शिर्षकांमध्ये नाव असतं. त्याला वाढवणा-या आणि घडवणा-या या माऊलीचा तो नेहमीच ऋणी आहे. 

त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंचा वर्षाव केला आहे.

Recommended

Loading...
Share