हो जा रंगीला रे म्हणत..सईने शेअर केले हे सही फोटो

By  
on  

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस लुक कॅरी करण्यात ही फॅशनिस्टा नेहमीच पुढे असते. वेस्टर्न असो किंवा ट्रेडीशनल दोन्ही आऊटफिटमध्ये सही एकदम सहीच दिसते. आत्तासुध्दा सईने एक हटटके फोटोशूट शेअ करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.   

 

 

हो जा रंगीला म्हणत सईने ह्या कलरफुल ड्रेसमधले फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

सई ताम्हणकरचा हा अवखळ अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला असून त्यांनी या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

 

 

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोची परिक्षक असलेली सई या शोच्या विविध एपिसोडसाठी एकापेक्षा एक लय भारी लुक्समधून प्रेक्षकांसमोर येते.

मिमि या बॉलिवूड सिनेमानंतर सही आणखी एका बॉलिवूडपटात झळकतेय. मधुर भांडारकर दिग्दर्शित इंडीया लॉकडाऊन या सिनेमात सई महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

 

Recommended

Loading...
Share