सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले झाले 'बेफाम'

By  
on  

'बेफाम" या चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर तर धुमाकुळच घातला होता,कारण पोस्टर मधील पाठमोरी व्यक्ती नक्की कोण आहे या प्रश्नाने साऱ्या रसिक प्रेक्षकांना भंडावून सोडले होते. आणि आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे ते म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. 'बेफाम' चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसह अभिनेत्री सखी गोखले यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

सिद्धार्थ आणि सखीची ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थला यशाच्या शिखरावर पोहोचण्यास कारणीभूत असलेल्या सखीची मैत्री, प्रेम आणि विश्वास याचे उत्तम समीकरण साधण्यात आले आहे. अशा या फ्रेश जोडीला 'अमोल कागणे स्टुडिओज' द्वारे  'बेफाम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे.

अमोल कागणे फिल्म्स प्रस्तुत, निर्माता अमोल लक्ष्मण कागणे निर्मित हा चित्रपट दिग्दर्शक कृष्णा कांबळे यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच निर्माता मिथिलेश सिंग राजपुतने या चित्रपटाकरिता एक्झिक्युटिव्ह आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसरची भूमिका उत्तमरित्या पार पाडली  आहे. लेखक विद्यासागर अद्यापक लिखित या चित्रपटाची कथा आहे. गायक अमित राज, मंदार खरे यांच्या सुमधुर स्वरात चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेतच शिवाय चित्रपटातील संगीत दिग्दर्शकाची धुरा अमित राज आणि मंदार खरे यांनी उत्तमरित्या पेलली आहे. तर गायक क्षितिज पटवर्धन यांच्या संगीत लहरींवर या चित्रपटातील गाण्यांनी चारचाँद लावले आहेत. संकलन राजेश राव आणि कला दिग्दर्शक नितीन बोरकर आणि वितरक म्हणून 'पिकल एंटरटेनमेंट' अशी इतर श्रेयनामावली आहे.

सिद्धार्थ आणि सखीसह या चित्रपटात अभिनेते विद्याधर जोशी, कमलेश सावंत आणि अभिनेत्री सीमा देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे . उभ्या ठाकलेल्या संकटांना निडरपणे तोंड देणे ही उत्तम शिकवण देणारा आणि अपयशाकडून यशाच्या शिखरावर नेत आपले आयुष्य सुखकर करणारा असा बेफाम सकारात्मक ऊर्जा देणारा हा 'बेफाम' चित्रपट साऱ्या महाराष्ट्रभर येत्या २६ फेब्रुवारी २०२१ला चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. 

Recommended

Loading...
Share