ह्या मराठी अभिनेत्याने केलीय श्रृती हसनसोबत स्क्रीन शेअर, जाणून घ्या

By  
on  

अभिनेता माधव देवचकेची ओळख ‘मोस्ट बॅलेन्स्ड बिग बॉस कंटेस्टंट’ अशी आहे.  माधवची त्याच्या चांगल्या वागणूकीमूळे प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. बिग बॉस मराठीमधून प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर टेलिव्हिजनवरचा हा लाडका अभिनेता सुभाष घई यांची निर्मिती असलेल्या विजेता या सिनेमात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला. त्यानंतर आता माधव आणखी एका मोठ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

कमल हसन यांची लेक आणि प्रसिध्द अभिनेत्री श्रृती हसनसोबत माधव स्क्रीन शेअऱ करतोय. ही एक हिंदी वेबसिरीज आहे. द पॉवर असं या वेबसिरीजचं नाव आहे. झी प्लेक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसिरीज प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजचं लेखन दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. सोशल मिडीयावरुन श्रृती हसन व महेश मांजरेकर यांच्यासोबत या वेबसिरीजच्या शूटींगदरम्याने फोटो शेअर करत आपण या प्रोजेक्टबद्दल प्रचंड उत्साहित असल्याचं माधवने म्हटलं आहे. 

 

 

 

शूटींग दरम्यानचे हे फोटो शेअर करत माधव म्हणतो, मेजर थ्रोबॅक. 

 

सत्ताकारणासाठी वाट्टेल ते करणा-या आणि प्रचंड हिंसेनी भरपूर असं द पॉवरचं कथानक आहे. या वेबसिरीजमध्ये माधवसह श्रृती हसन, अमोल पालेकर, विद्युत जामवाल, नसरुध्दीन शाह, जिशू सेनगुप्ता आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. 

Recommended

Loading...
Share