नवी नवरी मितालीने केला मेक ओव्हर, पाहा तिचा नवा लूक

By  
on  

काही दिवसांपुर्वीच लग्नाच्या बेडीत अडकलेली जोडी सिद्धार्थ-मिताली सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतात. ही जोडी सध्या एकामेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहेत. त्यांचे चील आऊट करतानाचे फोटो सोशल मिडीयावर समोर आले आहेत. 

 

पण यामध्ये एक हटके ट्वीस्टही आहे. हा ट्वीस्ट आहे मितालीच्या लूकमध्ये. लग्नानंतर मितालीने तिच्या मेकओव्हरचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. मितालीने तिचा हेअर कट चेंज केला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने तिचा हा नवा फोटो शेअर केला आहे. मितालीने Before आणि After असे दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये एका फोटोत तिचे लांबसडक केस दिसून येत आहेत. तर, दुसऱ्या फोटोमध्ये तिने केलेला हेअरकट पाहायला मिळत आहे. मितालीच्या या लूकचं चाहते कौतुक करत आहेत.

Recommended

Loading...
Share