By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या या सिनेमाला पूर्ण झाली 5 वर्षे, ओटीटीवरही पाहता येणार हा सिनेमा

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतच सोशल मिडीयावर तिच्या एका सिनेमाची आठवण शेयर केली आहे. निमित्त आहे तिच्या या सिनेमाला 5 वर्षे पूर्ण झाल्याचं. 2016 मध्ये सोनाली कुलकर्णीचा पोश्टर गर्ल हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. याच सिनेमाला नुकतीच 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. 

या पोस्टमध्ये सोनाली लिहीते की, "रूपाली आणि तिच्या गावातल्या कहाणी ला आज ५ वर्ष पूर्ण झाली...आज मात्र रखूमाई अनेक गावांमध्ये परतलीये ...आणि ज्या वैकुंठात आजही विठू माऊली एकटाच उभा आहे तिथे ही कारभार पेलवायला तिने परत यावं अशी आशा."

 

याशिवाय आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख सोनालीने या पोस्टमध्ये केला आहे. सोनालीचा पोश्टर गर्ल हा सिनेमा आता ओटीटीवरही पाहता येणार असल्याचं सोनाली सांगते. नेटफ्लिक्सवर आता हा सिनेमा प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे.

सोनालीसह या सिनेमात जितेंद्र जोशी, हृषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, संदीप पाठक, सिद्धार्थ मेनन, नेहा शितोळे, रसिका सुनील, अक्षय टांकसाळे, वैभव मांगले, आनंद इंगळे, प्रतिभा भगत हे कलाकार झळकले होते. 

Recommended

PeepingMoon Exclusive