आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी एक स्ट्रगल करावाच लागतो. कुठलीही गोष्ट सहजासहजी कोणालाज मिळत नाही. त्यामुळे स्ट्रगल हा कोणालाच चुकलेला नाही.मराठी सिनेसृष्टी गाजवणारी आपली लाडकी गुलाबाची कळी म्हणजेच अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आज सर्वांची लाडकी आणि सौंदर्यवती गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मी सिंधूताई सकपाळ ह्या सिनेमामुळे तिला खरी ओळख मिळाली व तिचा यशस्वी प्रवास सुरुच राहिला. पण इथपर्यंतचा तिचा प्रवास अजिबातच सोप्पा नव्हता. त्यासाठी तिला प्रचंड संघर्ष करावा लागला. नुकतंच आपल्या स्ट्रगलच्या दिवसांतील आठवणींना तेजस्विनीने उजाळा दिलाय.
एका टॉक शोमध्ये तेजस्विनीने हदय हेलावून टाकणारी आपल्या स्ट्रगलची कहाणी शेअर केली. एक असा कठीण काळ तिच्या आयुष्यात आला, मात्र त्यावेळीसुद्धा हार न मानता आपला स्ट्रगल सुरूच ठेवला. एकवेळ अशीही होती की घरात जेवायलाही पैसे नव्हते. त्यामुळे बिस्किटं खाऊन तिने दिवस काढले. इतकंच नाही तर पैसे नसल्याने वीज बीलही भरता यायचे नाही. त्यामुळे ते दिवस आम्ही अंधारातच राहायचो,असं तेजस्विनी सांगते. त्यानंतर तिने काही छोट्य़ा मोठ्या जाहिराती करुन पैसे मिळविले आणि थकीत वीजबील भरलं. हे सांगताना तिचे डोळे भरुन आले होते आणि दुसरीकडे आपण सर्व अडचणींवर मात करत आज यशस्वी अभिनेत्री असल्याचा खरा आनंदही दिसून येत होता.
https://www.instagram.com/p/Bq4KA5MBpTn/