‘राधा ही बावरी’ म्हणत शिवानी बावकरने शेअर केला हा व्हिडियो

By  
on  

शितली म्हणून घराघरांत पोहचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. खोडकर पण तितकीच निरागस शितली प्रत्येकालाच आवडली. 'लागिरं झालं जी' मालिकेतून शिवानीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यानंतर आल्टी-पल्टी या विनोदी शैलीतील मालिकेतूनसुध्दा झळकली.

 

 

शिवानी सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. आताही तिने एक गोड रील चाहत्यांशी शेअर केला आहे. स्वप्नील बांदोडकरच्या ‘राधा ही बावरी’ गाण्यावर अदाकारीची झलक दाखवताना या रीलमध्ये दिसते आहे. शिवानी काही दिवसांपुर्वीच लाजताना , वेड्या मना या रोमॅंटिक गाण्यांमध्ये दिसली होती.

Recommended

Loading...
Share