अभिनेत्री नंदिता पाटकरने शेअर केली ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेबाबत ही महत्त्वाची गोष्ट

By  
on  

 सुनील बर्वे आणि नंदिता पाटकर  यांच्या सूर्या आणि सरिता या व्यक्तिरेखांनी सजलेली 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका अल्पावधितच प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. दररोज या मालिकेतील उत्कंठावर्धक कथानक प्रेक्षकांना आकर्षित करतंय. चार भाऊ, त्यांच्या पत्नी आणि आई अशा हसत्या-खेळत्या कुटुंबाचं बाँडिंग अनेकांना आवडतं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nandita Patkar (@mi_nandita)

 

या मालिकेत सरिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे नंदिता पाटकर. नंदिताने नुकतीच या मालिकेबाबतची महत्त्वाची बाब शेअर केली आहे. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये नंदिता पाटकर म्हणते, सिरीयल करायला घाबरणारी मी, आमच्या "सहकुटुंब सहपरिवारात" कधी रमले कळलंच नाही. आणि आज ह्याला एक वर्ष झालं सुद्धा....’  या मालिकेतील कलाकारांचं ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन बाँडिंगही प्रेक्षकांना आवडत आहे.

Recommended

Loading...
Share