सुकन्या मोने यांनी शेअर केली पहिल्या सिनेमाची आठवण, झळकल्या होत्या अनिल कपूर यांच्यासोबत

By  
on  

अनेक नाटक, मालिका, सिनेमा यामधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या अभिनेत्री म्हणजे सुकन्या मोने. सुकन्या यांनी आजवर छोट्या आणि मोठ्या पडद्यावर अभिनय कौशल्य दाखवलं आहे. सुकन्या यांच्या अभिनय कलेची सुरुवात एका हिंदी सिनेमाने झाली होती. ‘ईश्वर’ असं या सिनेमाचं नाव होतं. या सिनेमबाबतची आठवण सुकन्या यांनी पोस्ट शेअर करत केली आहे.

 

 

आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात, ‘हा मी केलेला पहिला सिनेमा! कॅमेरा म्हणजे काय, शूटिंग म्हणजे काय.....काहीही माहीत नव्हतं केवळ सुलुमावशी ( सुलभाताई देशपांडे) म्हणाली म्हणून केला......तिच्यावर डोळे झाकून आमच्यासारखा आमच्या पालकांचाही विश्वास....तिने सांगितले ना जायला मग जायचे....ईश्वर.... अनिल कपूर ज्याची मी जबरदस्त fan.... विजयशांती,भारती आचरेकर,विनोद मेहरा,सदाशिव अमरापूरकर, शम्मी आंटी, आगा जी सगळेच मातब्बर कलाकार.....k. विश्वनाथ सारखे दिग्गज दिगदर्शक.....काय हवं होतं अजून ! पण तेव्हा ह्याच क्षेत्रात आपण काम करायचं अस अजिबात ठरलेलं नव्हतं त्यामुळे तेव्हा नाही पण आज 32 वर्षांनी त्याची किंमत कळतेय. 24 फेब्रुवारी1989 ला हा माझा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला....आणि ह्याची आठवण ज्येष्ठ समीक्षक मित्र दिलीप ठाकूर ने करून दिली.....त्याबद्दल त्याचे आभार’

Recommended

Loading...
Share