मराठी टेलिव्हिजनवरच्या ह्या प्रसिध्द अभिनेत्याचं व्यवसायात पदार्पण

By  
on  

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका चार वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय.  या मालिकेतील राणादा आणि अंजलीबाईंची जोडी आजही सुपरहिट ऑनस्क्रीन जोडी आहे.अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला,  या मालिकेवर आणि मालिकेमधील कलाकारांवरील प्रेक्षकांचं प्रेम सोशल मिडीयावर नेहमीच पाहायला मिळतं.

या मालिकेतला राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आज महाराष्ट्राच्या घराघरांत लाडका आहे. 

सर्वांच्या लाडक्या राणाादाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राणादा फेम हार्दीक जोशीने नुकतंच व्यसायात पदार्पण केलं आहे. कोल्हापूर बदाम थंडाई हे देसी कोल्ड्रीक हार्दिक जोशी कोल्हापूरकरांसाठी घेऊन आला आहे. हा त्याचा स्वत:चा ब्रॅण्ड आहे. त्याचा सर्वांनी आस्वाद घेण्याचं त्याने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर करत आवाहन केलं आहे. 

 

 

 

राणा दा सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत म्हणतो, आजवर तुम्ही माझ्यावर व माझ्या कामावर खूप प्रेम केलं, आता मी व्यवसायात पदार्पण करत आहे. या पुढेही आपला असाच पाठिंबा कायम माझा सोबत राहील हा मला विश्वास आहे...कोल्हापूर बदाम थंडाई, दिनांक 25 फेब्रुवारी म्हणजे आजपासून आपल्या सेवेत...मग काय येणार नव्ह ?
यायला लागतंय...चालतय की..या सायंकाळी 4.00 नंतर खाऊ गल्ली खासबाग मैदान कोल्हापूर 

Recommended

Loading...
Share