
. सिनेमे,मालिका,ट्रॅव्हल शो आणि आता कॉमेडी रिएलिटी शोचं निवेदन या सर्वांमुळेच अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत चर्चेत असते. सोशल मिडीयावर ती नेहमीच आपले विविध अपडेट्स चाहत्यांशी शेअर करते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या प्राजक्ताचा खुप मोठा चाहतावर्ग आहे.
आत्तासुध्दा प्राजक्ताने तिचं एक झक्कास फोटोशूट शेअर केलं आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचं प्राजक्ता बहारदार सूत्रसंचलन करते. यावेळी विविध लुक्समध्ये तिला पाहणं चाहत्यांसाठी पर्वणी ठरतं.
हे वेस्टर्न आऊटफिटमधलं फोटोशूट पाहून चाहतावर्ग प्रचंड खुश झाला आहे आणि त्यांनी तिच्या या फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केलीय.