रिंकूने पोस्ट केला व्हिडीओ, चाहते म्हणतात, 'उफ्फ तेरी अदा !'

By  
on  

सैराटची आर्ची फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या अदांची बातच निराळी आहे, रिंकू आपल्या निरनिराळ्या व्हिडीओ आणि फोटोंमधून सतत चाहत्यांचं  लक्ष वेधून घेत असते. आत्तासुध्दा एक जबरदस्त व्हिडीओ शेअर करत रिंकूने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

रिंकूचा हा रील व्हिडीओ पोस्ट करताच दोन तासांत तिच्या 45000 हजार चाहत्यांनी पाहिला असून लवकरच हा व्हिडीओ पन्नास हजार चा आकडा पार करेल. 

 

 

रिंकूच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.  

 

 

रिंकू मराठीतच नाही तर बॉलिवूड प्रोजेक्टसमध्येसुध्दा दिमाखात झळकते. नुकतीच रिंकू एमेझॉन प्राईमच्या अनपॉ्ज्ड वेबसिरीजच्या रॅट ए टॅटमध्ये झळकली होती. 

लॉकडाऊननंतर लंडनमध्ये चित्रित झालेल्या छुमंतर सिनेमात रिंकू झळकतेय. या सिनेमात अभिनेत्री प्रार्थाना बेहरे आणि रिंकू राजगुरु यांच्यासोबतच अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेनासुध्दा झळकणार आहेत. याशिवाय नाळ सिनेमामुळे महाराष्ट्राचा लाडका झालेला चैत्या फेम बालकलाकार श्रीनिवास पोकळेसुध्दा भूमिका साकारतोय. 

Recommended

Loading...
Share