By  
on  

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ऐतिहासिक 'जंगजौहर' सिनेमाचं नाव आता 'पावनखिंड'

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ऐतिहासिक 'जंगजौहर' सिनेमाचं नाव बदललं, आता 'पावनखिंड' नावाने हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  मुंबईत एका पत्रकार परिषदेत या नव्या शिर्षकाची घोषणा नुकतीच करण्यात आली. याशिवाय येत्या 10 जून रोजी 'पावनखिंड' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेसुध्दा उलगडले आहे. 

छत्रपती शिवरायांच्या एका शब्दाखातर जीवाची बाजी लावणारे अनेक वीरयोद्धे या भूमीने महाराष्ट्राला दिले आहेत. ज्यांचे धैर्य, शौर्य आणि आवेश पाहून शत्रूही थबकला होता अशा झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या अजोड पराक्रमाचा अध्याय उलगडून दाखविणाऱ्या 'पावनखिंड' ह्या सिनेमाची आता सर्वांनाच उत्सुकता आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive