सोहम बांदेकर म्हणतो, 'पोलिस अधिका-याची भूमिका पडद्यावर साकारणं जबाबदारीचं काम'

By  
on  

सेलिब्रिटी कपल आदेश आणि सुचित्रा बांदेकरांचा मुलगा सोहम बांदेकर अभिनय क्षेत्रात पदार्पण करतोय. सोहम बांदेकर स्टार प्रवाहच्याच ‘नवे लक्ष्य’ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करतो आहे. सोहमला अभिनयाची आवड होतीच मात्र निर्मात्याची जबाबदारी पार पाडत असताना अभिनयाची आवड द्विगुणीत होत गेली. इतर कलाकारांना सेटवर सीन करताना पाहून हा सीन मी कसा केला असता याचा सोहम अभ्यास करायचा.

 

 

'नवे लक्ष्य'च्या निमित्ताने अभिनेता सोहम बांदेकरशी पिपींगमून मराठीने खास बातचीत केली. पोलिस अधिका-याची भूमिका साकारणं एक जबाबदारीचं काम असल्याचं सोहम मानतो. आपण समाजाचं एक प्रतिबिंब दाखवतो, त्यामुळेैे जबाबदारीचं भान हवं. मलासुध्दा या भूमिकेसाठी जवळपास तीन ते चार लुक टेस्ट द्यावा लागल्या. त्यानंतरच अधिकृत माझी या भूमिकेसाठी निवड झाली.

 

 

आई-बाबा दोघांचाही खंबीर पाठिंबा असल्यामुळे मी हे आव्हान स्वीकारु शकलो.  गेले वर्षभर मी माझ्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतली आहे. याचा उपयोग जयची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला होतोय.

उदय सबनीस, शुभांगी सदावर्ते, अमित डोलावत, अभिजीत श्वेतचंद्र अशी दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे. लक्ष्यवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम ‘नवे लक्ष्य’लाही मिळेल याची मला खात्री आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका नवे लक्ष्य ७ मार्चपासून दर रविवारी रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’ 

Recommended

Loading...
Share