अभिनेता सुयश टिळकचा अपघात, सुयश सुखरुप

By  
on  

अभिनेता सुयश टिळकचा काल अपघात झाला. पण या अपघातात सुदैवाने सुयश बचावला आहे. त्याच्या गाडीला अपघात झाल्याचं कळताच चाहते काळजीत होते. पण सुयशने पोस्ट शेअर करत तो सुखरुप असल्याचं सांगितलं आहे. 28 फेब्रुवारीला पहाटे कॅबने प्रवास करत होता. या दरम्यान मालवाहतूक करणा-या वाहनाची सुयशच्या कॅबला जोरदार धडक बसली.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

 

गाडी रस्ता सोडून बाजूला फेकली गेली उलटली. अपघातात गाडीचं बरंच नुकसान झालं असून सुयश आणि गाडीचा चालक यांना मात्र सुदैवानं गंभीर इजा झाली नाही. यानंतर सुयशने एक पोस्ट शेअर करत तो सुखरुप असल्याचं कळवलं आहे. ‘तुमच्या प्रार्थना आणि प्रेमाचे आभार. मी सुखरुप आहे. कोणतीही गंभीर इजा नाही. माणूसकी अजूनही जिवंत आहे.’ सुयश आता ‘हॅशटॅग प्रेम’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Recommended

Loading...
Share