दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा, मिळाला हा पुरस्कार

By  
on  

प्रसिध्द दिग्दर्शक केदार शिंदे हे सोशल मिडीयाच्या माध्यामातून सतत सक्रीय असतात. अनेक सामाजिक विषयांवरसुध्दा बिनधास्तपणे व्यक्त होतात. उत्तम दिग्दर्शक असलेल्या केदार यांच्या शिरपेचात नुकताच मानाचा तुरा खोवला गेला आहे. केदार यांना नुकतंच  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. 

 

 

केदार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्विकारला. केदार सध्या कलर्स मराठीवर ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेतून भेटीला येत आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतो आहे. भरत जाधव, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, श्रुजा प्रभुदेसाई, मालिकेतील मोरू मैना यांनी देखील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकत्याच या मालिकेने 100 भागांचा टप्पाही पार केला आहे.

Recommended

Loading...
Share