युजरने विचारलं, ‘पहिला नवरा का सोडला?’ अभिज्ञाने दिलं खरमरीत उत्तर

By  
on  

प्रसिध्द अभिनेत्री अभिज्ञा भावेने ६ जानेवारी रोजी प्रियकर मेहूल पैसोबत लग्नगाठ बांधली. अभिज्ञाचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला होता. या लग्नसोहळ्यासाठी कलाविश्वातील अनेक प्रसिध्द कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिज्ञाचे हे दुसरे लग्न आहे. तिने दुसऱ्यांदा लग्न केल्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं.

 

अभिज्ञाने ट्रोल करणाऱ्यांना खरमरीत उत्तर दिले आहे. 'दुसऱ्या नवऱ्याचं काय एवढं, पहिला नवरा का सोडला अशी कमेंट एका युजरने केली होती.  यावर तिने त्यावर तिने त्या ट्रोलरला 'माझी सीरियल टीव्ही वर बघता. आयुष्य नाही. देव तुमच्यावर अशी वेळ आणू नये ही प्रार्थना' असे म्हणत उत्तर दिलं होतं. 'दुर्दैवाने माझेच मराठी बांधव'  हे कॅप्शन देत तिने या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

Recommended

Loading...
Share