अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकने त्याच्या हिरकणीसाठी शेअर केली ही खास पोस्ट

By  
on  

नुकतेच मराठी फिल्म फेअर अवॉर्डस पार पडले. यावेळी हिरकणी साकारणा-या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. यावेळी दिग्दर्शक प्रसाद ओकने त्याच्या हिरकणीसाठी खास पोस्ट शेअर केली. आपल्या पोस्टमध्ये प्रसाद म्हणतो, ‘प्रिय सोनाली... #filmfareawards2020 मधे #हिरकणी साठी तुला #bestactress #critics या पुरस्कारानी सन्मानित केलं... तुझ्या कष्टाचं फळ तुला मिळालं...

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prasad Oak (@oakprasad)

 

मनःपूर्वक अभिनंदन तुझं...!!! तुझी कामावरची निष्ठा आणि कळकळ कायम अशीच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!!! जय भवानी...जय शिवराय...!!!’  प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' सिनेमाला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. घरी एकट्या असलेल्या आपल्या बाळाला भेटण्यासाठी व्याकूळ झालेल्या आईची ही कथा आहे. सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यावर बाळाला भेटण्यासाठी एका रात्रीत खोल  गडाचा खडतर प्रवास करुन खाली उतरणारी हिरकणीची ही शौर्यागाथा आहे.  प्रसाद ओक आता चंद्रमुखी सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Recommended

Loading...
Share