रिंकू राजगुरुने शेअर केला बाळासोबतचा हा क्युट व्हिडियो

By  
on  

‘सैराट’ या सिनेमाचं नाव घेतलं तरी डोळ्यासमोर येतो तो आर्चीचा चेहरा. सैराटची आर्ची म्हणून अभिनेत्री रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचली. पदार्पणातील सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आज तिचा असंख्य मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.

 

 

सोशल मिडियावर रिंकूचं मोठं फॅन फॉलोविंग आहे. रिंकूच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडियोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतात. आताही तिचा एक गोड व्हिडियो व्हायरल होतो आहे. यामध्ये ती एका छोट्या बाळाला दुधाच्या बाटलीने दुध पाजताना दिसते आहे. हे बाळ रिंकूचा भाचा आहे. #nephewandaunttime असा हॅशटॅग रिंकूने या फोटोला दिला आहे. रिंकूच्या गोड व्हिडियोवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

Recommended

Loading...
Share