By  
on  

राजकीय नाट्याचा अंदाज दर्शवणाऱ्या 'खुर्ची' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित

सत्ता, राजकारण या विषयांवर अनेक मराठी सिनेमे तयार झाले आहेत. मात्र या राजकारणाचा लहान मुलांवर काय परिणाम होत असतो हे खुर्ची या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहेत.

 ‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित आणि दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील आणि ‘ऍक्ट प्लॅनेट टिम’ दिग्दर्शित ‘खुर्ची’ या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टर मध्ये खुर्ची साठी करण्यात आलेली लढाई उघडपणे पाहायला मिळत आहे. ‘आता खुर्ची आपलीच..’ या टॅगलाईन सह हे पोस्टर राजकीय नाट्याचा अंदाज दर्शवीत आहे. या चित्रपटात अभिनेता आर्यन संतोष हगवणे, अक्षय वाघमारे आणि अभिनेत्री श्रेया पसलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी ही  चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे.

हा चित्रपट सहनिर्माता सचिन दिपक शिंदे, विशाल आप्पा हगवणे, प्रदीप नत्थीसिंग नागर,  आणि डॉ स्नेहा जोगळेकर यांची सहनिर्मिती असून खेड्यापाड्यातल्या लहान मुलांपर्यंत पोहोचलेल्या राजकारणाचे चित्रण दर्शविणारा आहे.  ग्रामीण राजकारणाचा आजवर न पाहिलेला पैलु ‘खुर्ची’ या सिनेमाद्वारे लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे

Author

Recommended

PeepingMoon Exclusive