‘झी मराठी’ च्या कलाकारांमध्ये रंगला आहे ‘झिंगाट’ अंताक्षरीचा खेळ

By  
on  

फावल्या वेळात अंताक्षरी किंवा गाण्याच्या भेंड्या खेळायला आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडतात. झी मराठीवरील ‘झिंग झिंग झिंगाट’ या कार्यक्रमात अशीच अंताक्षरीची मजाही घेता येते. पण यावेळी हा कार्यक्रम जरा जास्तच खास होणार आहे. कारण यावेळी अंताक्षरी खेळायला कार्यक्रमात येणार आहेत झी मराठीच्या मालिकेतील कलाकारांमध्ये यावेळी अंताक्षरीचा खेळ रंगला आहे.

https://twitter.com/zeemarathi/status/1119209027882442759

यावेळी कलाकारांनी धमाल केली. या अंताक्षरीमध्ये राधिका, गुरुनाथ, माई, सौमित्र, श्रेया, कुशल, भारत, तुषार, अभिज्ञा, आईसाहेब हे कलाकार धमाल करताना दिसत आहेत. यावेळी माझ्या नव-याची बायको, चला हवा येऊ द्या, तुला पाहते रे या मालिकेतील कलाकार दिसतील. रसिकांना आवडत्या कलाकाराचं गायन कौशल्य अनुभवण्याची संधीही या निमिताने मिळणार आहे. झी मराठी हा २ तासाचा एपिसोड रविवारी २१ एप्रिल रोजी प्रसरित केला जाणार आहे.

Recommended

Loading...
Share