By  
on  

नेटिझन्सच्या ‘एवढी गचाळ का राहतेस’ या प्रश्नाला हेमांगी कवीने दिलं हे उत्तर

ट्रोलिंग आणि कलाकार यांचं जणू नातं असल्यासारखं सोशल मिडियावर दिसतं. कलाकारांना सोशल मिडियावर कौतुकासोबतच ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. कलाकारांना अनेकदा त्यांच्या लूक्स, कपडे, अभिनय किंवा एखाद्या प्रोजेक्टवरुनही ट्रोल केलं जातं. अभिनेत्री हेमांगी कवीलाही ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. हेमांगीने तिच्या पोस्टवरील कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

 

यात एक चाहती तिला म्हणते, ‘ एक्सप्रेशन आणि डान्स वगैरे ठिक आहे. पण एवढी गचाळ का राहतेसराहतेस. जरा टिप टॉप रहा म्हणजे आम्हाला बघवेल व्हिडियो प्लीज.’ यावर उत्तर देताना हेमांगी म्हणते, या फोटोतली comment वाचा! ती ही एका स्त्री ने लिहिलीये! शिकलेली, बऱ्या घरातली बाई! नक्की कुठे चाललोय आपण?आता या comments चा भडीमार होणार... ignore it, social media आहे हे, लोकं बोलणारच वगैरे वगैरे! मला एवढंच लक्षात आणून द्यायचंय की आपली मानसिकता काय होत चाललीये! ती जर चूक असले तर ती थांबवावी की नाही हे ज्याने त्याने ठरवावे!’ यावर नेटिझन्सही त्या महिलेच्या कमेंटच्या पद्धतीवर आक्षेप घेताना दिसत आहेत.

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive