पुन्हा रंगणार कुंटुंबात राजकारण, भाऊ-बहिणीच्या वादात जिंकणार कोण?

By  
on  

वेबविश्वात दरवेळी नवनवीन कलाकृती रसिकांच्या भेटीला येत असते. आताही राजकारण आणि कुटुंब यांच्यातील धुमसता संघर्ष अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही राजकारणावर आधारित असलेली वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या वेबसिरीजमध्ये बरेचसे मराठमोळे कलाकार दिसतील. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही वेबसिरीज नागेश कुकनूर यांनी दिग्दर्शित केली आहे.

https://twitter.com/bapat_priya/status/1119943311433687042

या वेबसिरीजमध्ये वडिलांचा राजकिय वारसा चालवण्यासाठी दोन भावंडांमध्ये सुरु असलेल्या कलहामुळे होणारी नात्यांची घालमेल, राजकारणाचे डाव प्रतिडाव याचं उत्तम दर्शन या ट्रेलरमधून घडतं. यात राजकारणी वडिलांच्या भूमिकेत अतुल कुलकर्णी आहेत. सिद्धार्थ चांदेकर आणि प्रिया बापट यात भावंडांच्या भूमिकेत दिसत आहेत. अभिनेते सचिन पिळगावकरदेखील यात विशेष भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय संदीप कुलकर्णी आणि उदय टिकेकर देखील दिसून येत आहेत. ही वेबसिरीज ३ मे २०१९मध्ये हॉटस्टार स्पेशलवर रिलीज होत आहे.

 

Recommended

Loading...
Share