‘असा दिला आवाज आता काय करायचं’ म्हणत महेश काळेंनी ट्रोलरला दिलं उत्तर

By  
on  

कलाकारांचं सोशल मिडिया अकाउंटवर एखाद्या फोटोवर किंवा पोस्टवर अनेकदा ट्रोलर्सच्या कमेंट्स दिसतात. अनेक कलाकारांना ट्रोलर्सच्या वाईट कमेंट्सना सामोरं जावं लागतं. गायक महेश काळेंबाबत असंच काहीसं झालं आहे.
महेश काळे यांनी नुकताच फेसबुक अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता.

 

या फोटोमध्ये त्यांनी निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली असल्याचे दिसत आहे. चाहत्यांनी त्यांच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला. पण काहींनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका नेटिझने  ‘भिमसेन एकच होऊ शकतात… तू तर नाकात गातो एवढं कर्कश कोण ऐकत कोण तूला…’ या आशयाची कमेंट करत ट्रोल केले होते. ती कमेंट पाहून महेश यांनीही हटके अंदाजात त्या ट्रोलरला सुनावलं आहे. महेश म्हणतात, ‘‘खरं आहे, एकच होऊ शकतात ते. असाच आवाज देवाने दिला आहे तर काय करु आता. मला पण कळत नाही का आवडतो लोकांना ते. तुम्ही सुखरुप रहा.’ महेश यांच्या उत्तराचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

Recommended

Loading...
Share