वहिनीसाहेब फेम धनश्री काडगावकरने ट्रोलर्सला सुनावले खडे बोल

By  
on  

सेलिब्रिटींना आजकाल सोशल मिडीयाच्या माध्यमामुळे सतत कुठल्या ना कुठल्या कारणास्तव ट्रोल केलं जातं. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. वहिनीसाहेब या भूमिकेमुळे धनश्री महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली.

 

धनश्रीसुध्दा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. काही महिन्यांपूर्वीच धनश्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. प्रेग्नन्सीच्या काळातसुध्दा धनश्री विविध फोटोशूट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. 

दरम्यान धनश्रीचे वाढलेले वजन पाहून तिला अनेकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. पण धनश्री देखील शांत बसली नाही तिने देखील ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले. तसंच फॉलो करणा-या चाहत्यांनासुध्दा या व्यक्तीला रिपोर्ट करा असं आवाहन केलं. 

धनश्रीने 'इन्स्टाग्राम कुटुंबाचे आभार.. अनेकांनी ते अकाऊंट रिपोर्ट केले आहे. तसेच मी फूटबॉल झाले अशी कमेंट करणाऱ्यांना सुद्धा माझ्या फॉलोअर्सपैकी अनेकांनी सडेतोड उत्तर दिले आहे.. तुमच्या सर्वांचे मनापासून आभार' असे म्हटले आहे.

प्रेग्नन्सीनंतर  वाढलेल्या वजनामुळे अभिनेत्रींना ट्रोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पयापूर्वीसुध्दा अनेक अभिनेत्रींना ट्रोल करण्यात आलं आहे. यामध्ये नेहा धुपिया, माही गिल यांसारख्या अभिनेत्रींचा देखील समावेश आहे. 

Recommended

Loading...
Share