युजरने मानसी नाईकवर केली ‘अशी’ कमेंट, मानसीने घेतला चांगलाच समाचार

By  
on  

कलाकारांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. सोशल मिडियावर अनेकदा वाईट भाषेतही त्यांच्यावर कमेंट केल्या जातात. अभिनेत्रींबाबत तर हा प्रकार सर्रास दिसून येतो. अभिनेत्री मानसी नाईकला एका नेटिझनने अत्यंत असभ्य भाषेत कमेंट केली होती. मानसीने या कमेंटचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mardmarathi (@mardmarathi99)

 

मानसी म्हणते, ‘ तुम्ही कधी मला बुधवार पेठेत पाहिलत? तुम्ही तिथे काय करत होतात. बुधवार पेठेतील स्त्रिया स्वत:चं पोट भरत आहेत. मेहनत करतात. तुम्ही प्रामाणिकपणे काम करुन दाखवा. या महिलांना देखील अस्तित्व आहे. त्यांना देखील सन्मान देण्याची गरज असल्याचं मानसीने म्हटलं आहे. याशिवाय ट्रोलिंगची असभ्य भाषा आता अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचंही तिने म्हटलं आहे.

Recommended

Loading...
Share