By  
on  

आदिनाथ कोठारे आणि त्याच्या आज्जीचा हा संवाद वाचून तुम्हालाही बसेल शॉक

मराठी सिनेसृष्टीतला हॅण्डसम हंक अभिनेता-दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून आदिनाथ कोठारे ओळखला जातो. सोशल मिडीयावर आदिनाथ सतत सक्रीय असतो. फोटो आणि व्हिडीओंपेक्षा आदिनाथने आजुबाजूच्या निरिक्षणातून लिहलेल्या ह्युमरस पोस्ट जास्त चर्चेत असतात. त्याच्या ह्या संवादरुपी पोस्ट चाहत्यांनासुध्दा भलत्याच आवडतात. अनेकदा आदिनाथ त्याच्या कुटुंबियांसोबतचे धम्माल संवाद इथे शेअर  करतो. कधी  लेक जिजासोबतचा संवाद तर कधी आजोबा, पत्नी उर्मिला यांच्या सोबतचे संवाद . सद्या आदिनाथच्या ह्या  दोन पोस्ट प्रचंड व्हायरल होतायत. त्या वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

नुकताच मदर्स डे उत्साहात साजरा झाला यानिमित्ताने लेक जिजासोबतचा गोड फोटो शेअर करत आदिनाथने ही धम्माल पोस्ट केलीय. यात जिजा आणि तिचा डॅडा घरात आहेत. त्यांच्यातील हा संवाद. जिजा म्हणते, डॅडा आई कधी येणार...डॅडा उत्तर देतो...येईल गं, मी आहे ना..यावर जिजा प्रतिक्रीया  देते...म्हणूनच विचारतेय 

 

तर आणखी एका पोस्टमध्ये आज्जी आणि आदिनाथचा संवाद सुरु आहे. 

आज्जी - मी गेले की, माझी बॉडी त्या इलेक्ट्रीक ह्याच्यात टाकू नका हं. लाकडावरच जाळून टाका

आदि- का गं , इलेक्ट्रिक जास्त सोप्प आहे. 

आज्जी - गप्प बस. त्या इलेक्ट्रीक शॉकने मी चुकून जिवंत झाले तर..त्या मशीनमधून तुम्हाला माझ्या हाका पण ऐकू येणार नाहीत. 

 

आज्जी आणि आदीमधला हा गमतीदार संवाद वाचून चेह-यावरचं  हसू आवरता येत नाही, हे मात्र नक्की. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive