लस घेताना या मराठी अभिनेत्रीचा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’, नेटिझन्स संतापले

By  
on  

सध्या कोविड लसीकरण जोर दिसतो आहे. घरी राहण्यासोबतच लस घेण्यालाही प्राधान्य दिलं जात आहे. सध्या करोना प्रतिबंधक लस घेण्याचं आवाहनही केलं जात आहे. अनेक कलाकारही स्वत: लस घेत आहेत. याशिवाय चाहत्यांना करोना लस घेण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. 

 

 

पण लसीकरण केंद्रावर एका अभिनेत्रीच्या अभिनयाची चर्चा होते आहे. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात सामिल झालेल्या हीना पांचाळने देखील करोना लसीचा पहिला डोस घेतला. लसीकरणाचा एक व्हिडीओ हीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडीओमुळे हीनाला माज्ञ नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय.  एका युजरने तिच्या व्हिडियोवर कमेंट करत  ओव्हर अ‍ॅक्टिंगचे ५० रुपये कट असं म्हटलं आहे. तर एकाने ‘कॉमन लोकांना लस मिळत नाही. आणि ते रील बनवत बसतात. अशी कमेंट एका युजरने केली आहे.

Recommended

Loading...
Share