30 किलोंचा लेहंगा आणि माधुरीचा जबरदस्त डान्स, तेव्हा रंगली होती खुप चर्चा

By  
on  

जिच्या नावाने काळजाचा ठोका चुकतो ती बॉलिवुडची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित.  'धकधक गर्ल' म्हणून प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणा-या या अभिनेत्रीचा आज वाढदिवस.सौंदर्य आणि अदाकारी याचा सुंदर मिलाफ साधणा-या या अभिनेत्रीचं नृत्यावरचं प्रेम तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आजही ती कथ्थकचा रियाज न चुकता करते. तिच्या इन्स्टाग्राम व्हिडींओवरुन ते लक्षात येतं. डान्स शोचं परिक्षण असो किंवा सध्या ऑनलाईन डान्स क्लास घेणं असो माधुरीचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. 

चला तर जाणून घेऊयात, माधुरीच्या डान्सप्रेमाचा एक अनोखा किस्सा, देवदास सिनेमातले तिचे विविध लुक घायाळ करणारेच आहेत तुम्ही पाहिलेच असतील. संजय लीला भन्साळी यांच्या या देवदासमधली चंद्रमुखी साकारुन माधुरीने पुन्हा एकदा रसिकांवर मोहिनी घातली होती.  या सेटवरचाच हा किस्सा आहे.

 

 

देवदास या सिनेमातल्या एका गाण्यासाठी माधुरीला भरजरी लेहंगा घालायचा होता, त्याची किंमतसुध्दा लाखांच्या घरात होती. व तो लेहंगा हा जवळपास ३० किलोंचा होता. तरत्याची किंमतसुध्दा २० लाखांच्या जवळपास असल्याचं बोललं गेलं. पण माधुरी त्या रत्नजडीत वजनदार लेहंग्यासह जबरदस्त थिरकली व थकव्यामुळे आपल्या अदाकारीत कुठलीच कसर तिने कमी पडू दिली नाही, उलट मोठ्या उत्साहात तिने तो डान्स केला. 

 

 

पाहा देवदास सिनेमातलं गाणं - 'छेड़ो ना मोहे':

 

 

Recommended

Loading...
Share