देवी सिंगला पकडण्यासाठी सापळा रचणा-या लेडी सिंघमचा हा बोल्ड अंदाज पाहा

By  
on  

 ‘देवमाणूस’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत एसीपी दिव्या सिंग  एन्ट्रीने ट्विस्ट निर्माण झाला आहे. गावाला गंडवणाऱ्या डॉ. अजितकुमार देवचे काळे धंदे दिव्या उघडकीस आणणार, असं वाटत होतं. मात्र आता खुद्द दिव्याच अजितच्या जाळ्यात फसताना दिसत आहे. त्यामुळे या मालिकेत नवं वळण आलं  आहे. 

दिव्याच्या भूमिकेमुळे अभिनेत्री नेहा खान महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय . एसीपी दिव्याच्या अंदाजातील काही हटके व्हिडीओ नेहाने आपल्या सोसल मिडीया पेजवर अपलोड केले आहेत. चाहत्यांची त्याला बरीच पसंती मिळतेय.

शिकारी या धम्माल विनोदी सिनेमातून नेहाचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांसमोर आला. तिच्या या सिनेमाची बरीच चर्चा रंगली. 

अभिनेत्री नेहा खानचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. तिची आई मराठी, तर वडील मुस्लीम. नेहा ही तिच्या वडिलांच्या तिसऱ्या बायकोची मुलगी. 

मूळची अमरावतीची असलेली नेहा सिनेसृष्टीत काम मिळवण्यासाठी बरीच धडपडली. कधी काळी तर गाडी चुकल्यावर तिला रेल्वे स्टेशनवरच झोपावं लागायचं.

नेहाने आत्तापर्यंत बॅड गर्ल, काळे धंदे, शिकारी, हाफ ट्रुथ, गुरुकुल, बियॉन्ड बॉर्डर्स सारख्या चित्रपटातून तिने काम केले आहे. 

Recommended

Loading...
Share