अभिनेता सचिन पिळगावकर यांनी शेअर केली या खास गाण्याची आठवण

By  
on  

अनेक कलाप्रकारात स्वत:ची खास ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे सचिन पिळगावकर. अभिनय, दिग्दर्शन, नृत्य  आणि गायन  या क्षेत्रात त्यांनी आपला खास ठसा उमटवला आहे. सचिन आपल्या सिनेमांबाबतच्या अनेक आठवणी चाहत्यांशी शेअर करत असतात. सचिन यांनी नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. 

 

 

सचिन यांच्या बालिकावधू सिनेमातील गाण्याचा हा व्हिडियो आहे. या सिनेमातील  ‘बडे अच्छे लगते है’ हे गाणं बरंच लोकप्रिय झालं होतं. या गाण्याचा व्हिडियो सचिन यांनी शेअर केला आहे. या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये सचिन म्हणतात, ‘ 45 वर्षांनंतरही हे गाणं तितकंच सुश्राव्य आहे. माझ्यासाठी हे गाणं खुप खास आहे. या सिनेमात सचिन यांच्यासोबत रजनी शर्मा आणि प्रेमा नारायण या अभिनेत्री दिसल्या होत्या.

Recommended

Loading...
Share