अभिनेता भुषण कडूवर दु:खाचा डोंगर, पत्नी कादंबरीचा करोनाने मृत्यू

By  
on  

अभिनेता भुषण कडू याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भुषणची पत्नी कादंबरीचं करोनाने निधन झालं आहे. कादंबरीचं वय 39 होतं.     काही दिवसांपूर्वीच कादंबरी कडू आणि भूषण कडू दोघांनाही करोनाची लागण झाली होती. भूषणची प्रकृती सुधारल्याने त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. 

 

 

पण कादंबरीची प्रकृती जास्तच बिघडत गेली. पण काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भुषण आणि कादंबरी यांना 9 वर्षाचा मुलगा आहे. कादंबरी आणि मुलगा प्रकिर्त यापुर्वी बिग बॉसमध्ये भुषणच्या भेटीला आले होते. भुषण यापुर्वी  ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ यासोबतच ‘कॉमेडीती बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या शोमध्ये दिसला होता.

Recommended

Loading...
Share