अपुर्वा नेमळेकरची अभिनयक्षेत्रात 10 वर्षं पुर्ण, शेअर केली ही खास पोस्ट

By  
on  

रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेच्या प्रीक्वेलने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. या मालिकेत सर्वात जास्त कौतुक वाट्याला आलं ते शेवंताच्या. अपुर्वा नेमळेकरने साकारलेल्या शेवंताची बरीच चर्चा झाली.अपुर्वाने नाटक, मालिका या माध्यमातून काम केलं आहे. अपुर्वाच्या अभिनयक्षेत्रातील पदार्पणाला नुकतीच दहा वर्षं पुर्ण झाली आहेत. यावेळी तिने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

 

 

आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘अपूर्वा च्या यशाची दशकपूर्ती !!
मुंबईच्या रुपारेल कॉलेजमधून बी.एम.एस ची पदवी संपादन करून पुढील उच्च शिक्षणासाठी मला परदेशी जायचं होतं परंतु 2011साली झी मराठी वरील 'आभास हा' या मालिकेतून मी या चंदेरी दुनियेत प्रवेश केला. त्यानंतर 'एकापेक्षा एक' या डान्स शोमध्ये भाग घेतला.'भाखरखाडी 7किमी', 'इश्क वाला लव्ह','व्हीला','द ऍक्सीडेन्टल प्रायं मिनिस्टर','सब कुशल मंगल' यासारख्या हिंदी वं मराठी फिल्म करण्याची संधी मिळाली.'आराधना','तू जीवाला गुंतवावे','प्रेम हे','तू माझा सांगती' या टीव्ही मालिकांमधून मी घराघरात पोहचले.'जगन्नाथ गंगाराम पेडणेकर' सारख्या सुप्रसिद्ध ज्वेलरीचा ब्रँड अँबेसिडर म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली.बर्‍याचदा असं झाले की हीरोइन म्हणून मुख्य रोलसाठी माझी निवड झाली आणि अंतिम क्षणी मला बदलण्यात आलं.. तेव्हा खुप डिप्रेशन पण आलं.आणि असंही झालं की मुख्य हिरोईन म्हणून रोल केलेल्या फिल्म शूटिंग पूर्ण होऊनसुद्धा दुर्देवाने रिलीज झाल्या नाहीत.त्यामुळे जीवनात यश-अपयशाच्या पायऱ्या खालीवर होने चालूच होतं.'आलाय मोठा शहाणा' या आयुष्यातील पहिल्यां नाटकातून रंगमंचावर पाऊल ठेवल आणि याच नाटकासाठी मला नाट्य परिषदेचा बेस्ट एक्ट्रेस इन कॉमिक रोल हा पुरस्कार मिळाला.

 

 

त्यानंतर 'चोरीचा मामला'आणि आता 'इब्लिस' हे नाटक मी करत आहे. आयुष्यात अनेक चढ-उतार आले मधेच माझा आधारवड असलेले माझे बाबा सोडून गेले.अगदी आभाळ फाटल्या सारखं झालं. अनेक संकटांना तोंड देत 'क्राइम पेट्रोल','सावधान इंडिया' यासारखे एपिसोडीक शो सुरू ठेवले.ज्या मालिकेने मला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं ती झी मराठी ची मालिका 'रात्रीस खेळ चाले' त्यातील माझी भूमिका म्हणजे 'शेवंता' आज रसिकांच्या ह्रदयावर वर अजरामर झाली आहे.शेवंता भूमिकेसाठी मला झी मराठीने झी बेस्ट एकट्रेस पुरस्कार देऊन गौरवले आहे.

कुटुंबाच्या सहकार्याने,आईच्या आशीर्वादाने आणि रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रेमामुळे मी आजही तुमच्या मनात रुतून बसलेली आहे.लॉकडाऊन काळातही 'अशी मी?तशी मी?कशी मी?' होऊन यूट्यूब चैनल वर कार्यरत राहिले.'तुझं माझं जमतय' ही सीरिअल संपून आता 'रात्रीस खेळ चाले 3' मधून तुमच्या सेवेत आलेली आहे.
माझ्या या सांस्कृतिक सेवेची 2011 ते 2021 दशक पूर्ती 30 मे ला पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने माझा फिल्म सृष्टीतल्या प्रवास तुमच्या समोर मांडून तुमच्याशी हितगूज केलं. या संपूर्ण प्रवासात मला विद्याधर पाठारे सर,निलेश मयेकर सर,आणि सोजल सावंत यांचे सहकार्य मिळाले. त्यांची मी शतशः ऋणी आहे.
तुमची लाडकी.
अपूर्वा सुभाष नेमळेकर.’

Recommended

Loading...
Share