'पाहुणा तो नाही, आम्ही आहोत', सिध्दार्थ-मितालीच्या घराजवळ भरली शेपटीवाल्या प्राण्यांची सभा

By  
on  

मराठी मनोरंजनविश्वातील सेलिब्रिटी जोडी सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे अलिकडेच लग्नबंधनात अडकले. ही जोडी चाहत्यांची खुप लाडकी आहे. ते सतत एकमेकांसोबतच्या गोड क्षणांचे फोटो चाहत्यांशी शेअर करतात. त्यांच्या फोटोंना चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. पण नुकतंच या दोघांनी ापल्या सोशल मिडीया अकांऊटवरुन एक फोटो पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. 

सिध्दार्थ-मिताली राहतात त्या गोरेगाव येथील इमारतीच्या परिसरात त्यांना चक्क एक बिबट्या दिसला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी त्याला आपल्या कॅमे-यात कैद केला आणि हा फोटो चाहत्यांशी शेअर केला. त्यासोबतच सिध्दार्थच्या कॅप्शननेही लक्ष वेधून घेतलं आहे. 

सिध्दार्थ म्हणतो, "आमच्या बिल्डिंग च्या मागे आज एक पाहुणा आला होता. बराच वेळ आमच्याकडे टक लावून बघत बसला आणि झुडपात निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर एक जखम दिसली. "तुमच्यामुळे झालंय हे" असं नजरेतून सांगत होता. बिल्डिंग मधले सगळे फोटो काढायला खिडकीत आले. मी पण आलो. तो फक्त स्थिर नजरेनं बघत होता आमच्याकडे. त्याचा नजरेतून कळत होतं स्पष्ट की पाहुणा तो नाही, आम्ही आहोत. हे त्याचं घर आहे."

खरंच सिध्दार्थची ही पोस्ट विचार करायला लावणारी आहे. पाहुणा तो आहे की, आपण 

 

सिध्दार्थ चांदेकरला फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे. तो नेहमीच नेचर फोटोग्राफी करताना पाहायला मिळतो. विविध सुंदर फोटोसुध्दा तो पोस्ट करतो. 

 

Recommended

Loading...
Share